‘जोशी अॅण्ड धुरी‘ मेडिकलचा शुभारंभ

 वेंगुर्ला रामेश्वर मंदिर समोर नव्याने सुरु झालेल्या जोशी अॅण्ड धुरीया मेडिकल स्टोअर्सचा शुभारंभ महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून १ मे रोजी उदय धुरी व पुरुषोत्तम जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. उद्घाटनानंतर व्यापारी संघाचे अध्यक्ष व वेंगुर्ला मेडिकल असोसिएशनचे विवेक खानोलकर यांच्यासह अन्य मान्यवर, हितचितक व ग्राहकांनी भेट देऊन मेडिकलचे संचालक उत्कर्ष जोशी व आदित्य धुरी यांना शुभेच्छा दिल्या. या मेडिकलमध्ये अॅलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, सौंदर्य प्रसाधने आणि प्राण्यांची औषधे उपलब्ध आहेत. रुग्ण व ग्राहक यांची गैरसोय टाळण्यासाठी सदरचे मेडिकल हे दुपारी सुद्धा सुरु राहणार आहे.

Leave a Reply

Close Menu