►डॉ.केशव देसाई दूरदर्शन सह्याद्रीद्वारे करणार मार्गदर्शन

            दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील कृषीदर्शनया कार्यक्रमात वेंगुर्ला येथील सुपुत्र आणि किर्लोस येथील कृषी विज्ञान केंद्रातील पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ.केशव देसाई हे परसबागेतील कुक्कुटपालनाचे सुधारीत तंत्रज्ञानयावर मार्गदर्शन करणार आहेत.

      हे मार्गदर्शन सोमवार दि.३० मे २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता होणार असून याचे पुनःप्रसारण मंगळवार दि.३१ मे रोजी सकाळी ६ वाजता होणार आहेत. तरी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu