►वेंगुर्ला येथे २१ जून जागतिक योग दिन

वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वामी विवेकानंद हॉल येथे मंगळवार २१ जून रोजी सकाळी ६ ते ७.३० या वेळेत जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

      ‘योग असे जेथे… आरोग्य वसे तेथे….हे ब्रीद घेऊन वेंगुर्ला नगरपरिषद आणि सिंधुदुर्ग योग प्रसार संस्था, डॉ. वसुधाज् योगा अॅण्ड फिटनेस अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने हा जागतिक योग दिन कार्यक्रम होणार आहे. तरी नागरिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सिधुदुर्ग योग प्रसार संस्थेचे अध्यक्ष डॉ.योगेश नवांगुळ, डॉ.वसुधा मोरे, माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे आणि नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी संगिता कुबल यांनी केले आहे.

Leave a Reply

Close Menu