जिल्हा पत्रकार संघ नूतन कार्यकारिणी सभा संपन्न

        सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संघाच्या अध्यक्षपदी उमेश तोरस्कर (कुडाळ), कार्यवाहपदी देवयानी वरसकर (सिंधुनगरी), उपाध्यक्षपदी रमेश जोगळे (कणकवली), बाळ खडपकर (सिंधुनगरी), विद्याधर केनवडेकर (मालवण), दाजी नाईक (वेंगुर्ला), खजिनदारपदी संतोष सावंत (सावंतवाडी), सहकार्यवाहपदी महेश रावराणे (वैभववाडी) तर कार्यकारिणी सदस्य म्हणून संतोष राऊळ (कणकवली), महेश सरनाईक (मालवण), राजन नाईक (कुडाळ), हरिश्‍चंद्र पवार (सावंतवाडी), दीपेश परब (वेंगुर्ला), राजेंद्र मुंबरकर (देवगड), लखू खरवत (दोडामार्ग), प्रकाश काळे (वैभववाडी) या पदाधिका-यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, वेंगुर्ला येथील पत्रकार दाजी नाईक व दिपेश परब यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल वेंगुर्ला भाजपाच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

      या नूतन कार्यकारिणीची सभा ओरोस येथील शासकीय विश्रामगृहावर 5 जुलै रोजी घेण्यात आली. त्यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे सदस्य असलेल्या सदस्यांना ओळखपत्रे देण्याचे तसेच पत्रकार भवनासंदर्भात पुढील कार्यकारी समितीसाठी पाठपुरावा करण्याचे यावेळी ठरले.

      या सभेत पत्रकार संघासाठी अध्यक्ष उमेश तोरसकर यांनी एक लाख रुपये रोख रक्कम देणगी स्वरूपात सुपूर्द केली. कार्यकारिणी सदस्य राजन नाईक यांनी दहा हजार रुपये देणगी दिली. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नेमणूक पत्र दिली. निवडणूक निर्णय अधिकारी वसंत केसरकर व सहाय्यक अधिकारी अशोक करंबेळकर तसेच परिषद प्रतिनिधी गणेश जेठे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu