गायनाचा कार्यक्रम व सत्कार समारंभ सपन्न

नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून वेतोरे येथील श्री सातेरी मंदिरात ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत संदेश प्रभूमातोंडकर (झाराप), हनुमंत (आबा) पाटील (आंदुर्ले) व प्रफुल्ल रेवंडकर (आंदुर्ले) यांचा सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम पार पडला. गायनाचा कार्यक्रम हे एक निमित्त होते. पण मुख्य हेतू हे तिनही कलाकार गायन कलेत किती निपुण आहेत, त्यची साधना किती आहे हे श्रोत्यांना समजण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती आत्माराम बागलकर (आडेली) यांनी दिली. आपल्या अवती भवती असे कितीतरी शेकडोंनी कलाकार असताना आपल्या कार्यक्रमप्रसंगी आपण बाहेरुन आयात केलेल्या कलाकारांना मोठाल्या देणग्या देता आणि निराशा पदरी पाडून घेतो. मोठाल्या देणगीच्या मानाने थोडक्यात कार्यक्रम आटोपून आपल्याला निराश करतात. त्याऐवजी आपल्या अवती भोवती असलेल्या भजनी मंडळांना, किर्तनकारांना, गायकांना सन्माननीय मानधन देऊन संधी दिली, त्यांना मोठे केले तर त्यांची पण प्रगती होईल. कार्यक्रमाचे चीज होईल. आपणाला समाधान मिळेल असे उद्गार या कलाकरांच्या सत्कारप्रसंगी श्री.बागलकर यांनी काढले.

 

Leave a Reply

Close Menu