तरुण पिढीने धम्म जाणून घेणे आवश्यक

सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग व गोवा विभाग यांच्यावतीने १६ ऑक्टोबर रोजी साई मंगल कार्यालय येथे  ६६ वा धम्मचक्र प्रर्वतन दिन व बौद्ध हितवर्धक महासंघाचे संस्थापक दिवंगत वि.तु.जाधव यांचे जन्म शताब्दी वर्ष साजरे करण्यात आले. सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबईचे सरचिटणीस बी.एस.कदम यांनी दीपप्रज्वलन करुन भगवान गौतम बुद्ध, डॉ. आंबेडकर व वि.तु.जाधव यांच्या  प्रतिमांना पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर धम्मचारी तेजोवज्र व धम्मचारी अमृतसागर यांनी बुध्दपूजा, वंदना घेतली. धम्मचारी तेजोव्रज यांनी आपल्या प्रवचनात बौद्ध धम्माच्या आचरणाचा मार्ग बुद्धाचे विचार, शिल, प्रज्ञा, करूणा यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर धम्ममित्र तेजबोधी व तेजोव्रज यांनी श्रेयस जाधव, तेजस जाधव, शशांक जाधव, प्रजेश जाधव, सुजल जाधव, साहिल जाधव, तनिष जाधव, सायली जाधव, अनुष्का जाधव, रेणूका जाधव, सायली पावसकर यांना बौद्ध धम्म दिक्षा देण्यात आली. या सर्वांना मान्यवरांच्या प्रमाणपत्र देण्यात आले.

        तरुण पिढीने मोबाईल, इंटरनेटच्या माध्यमातून धम्माबाबत ज्ञान घेणे आवश्यक आहे. धम्म म्हणजे काय हे जाणून घ्या, वाचन करा असे आवाहन प्रा. नंदगिरीकर यांनी केले. सिंधुदुर्ग बौद्ध हितवर्धक महासंघ मुंबई शाखा वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग व गोवा विभाग या संस्थेला सहकार्य व योगदान देणा-या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. पांडुरंग कदम, तुकाराम तांबोसकर, महेंद्र सावंत, गोपाळ जाधव, भिकाजी वर्देकर, महेश परुळेकर, नारायण आरोंदेकर, दिवंगत वि.तु.जाधव यांचे चिरंजीव डॉ.उल्हास जाधव यांनी धम्माबाबत विचार मांडले.

         दिवंगत वि.तु.जाधव यांनी संस्थेला दिलेले योगदान, त्याचा जीवनपट व त्यांच्या पुस्तकांबाबत सुभाष जाधव यांनी तर बी.एस.कदम यांनी संस्थेच्या वाटचालीबाबत माहिती दिली. विठ्ठल जाधव व किरण जाधव यांनी सूत्रसंचालन, अमोल जाधव यांनी प्रस्तावना तर सुभाष जाधव यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंत जाधव, वाय.जी.कदम, गजानन जाधव, महेंद्र जाधव, दिपक जाधव, प्रेमानंद जाधव यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Close Menu