सुरेश कौलगेकर यांना सर्वोच्च पुरस्कार

पत्रकारितेतील सर्वोच्च असा राज्यस्तरीय सन २०२२ चा मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार वेंगुर्ला येथील पत्रकार सुरेश कौलगेकर यांना घोषित झाला आहे. या पुरस्काराचे वितरण देवगड-पोंभूर्ले येथे ६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. कौलगेकर यांनी कोकण सारख्या ग्रामीण भागातील अनेक सामाजिक विषयांना आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक दुर्लक्षित घटकांना समाजात स्थान व त्याच्या प्रश्नांना व्यासपीठ देण्याचे कार्य केले आहे. सामाजिकतेबरोबरच क्रीडा, शिक्षण, साहित्य, पर्यटन, कृषी, क्राईम विषयक घटना यांना पत्रकारितेच्या माध्यमातून न्याय दिला या त्याच्या सर्वांगीण कार्याबद्दल त्यांना हा राज्यस्तरीय दर्पण पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्यावतीने संस्थेचे अध्यक्ष रविद्र बेडकिहाळ यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu