भगवद्‌ भक्ती प्रबोधिनी जिल्हाध्यक्षपदी संजय पुनाळेकर

 भगवद्‌ भक्ती प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या नूतन कार्यकारीणी अध्यक्षपदी संजय पुनाळेकर यांची एकमताने निवड करण्यात आली. यापूर्वीचे अध्यक्ष ह.भ.प. श्रीराम झारापकर आणि उपाध्यक्ष ह.भ.प. दीपक नेवगी यांच्या निधनानंतर ही पदे रिक्त होती. जिल्ह्यातील सुमारे 150 कीर्तनकार सभासद असलेल्या कार्यकारिणीची मुदत संपल्याने हंगामी अध्यक्ष किशोर राणे यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित सदस्यांतून जिल्ह्यातील सर्व भागातून 15 सदस्यांची निवड करण्यात आली.

      यामध्ये अध्यक्ष- संजय पुनाळेकर (वेंगुर्ला), उपाध्यक्ष- पुरूषोत्तम काजरेकर (घोटगे-जांभवडे), कार्यवाह- दिनकर प्रभू-केळुसकर (केळूस), खजिनदार- किरण पारकर (आंब्रड), तसेच कार्यकारिणी सदस्य- प्रशांत धोंड (पिंगुळी), शेखर पाडगावकर (मळगाव), सुधीर जडीये (सांगेली), रामचंद्र मेस्त्री (कालेली), किशोर राणे (जानवली), पद्मनाभ पटक (ओरोस), महेश बोवलेकर (मठ), अवधूत नाईक (खानोली-वायंगणी), सदाशिव पाटील (आंदुर्ले), केतकी सावंत (पोखरण), श्रद्धा ठाकुर (म्हापण) यांचा समावेश आहे.

  कीर्तन विद्यालयातून नवनवीन कीर्तनकार निर्माण करणे, त्याचप्रमाणे कीर्तनाचा प्रसार आणि प्रचार समाजामध्ये वाढविणे ही सर्व कामे नवीन कार्यकारिणीच्या सहकार्याने पुढे जोमाने सुरू राहतील, असे संजय पुनाळेकर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Close Menu