जबरदस्त मंडळातर्फे विद्यार्थी गुणगौरव

  वेंगुर्ला येथील रामेश्वर मंदिरात जबरदस्त सांस्कृतिक, कला-क्रिडा मंडळ, राऊळवाडातर्फे भारतीय प्रशासन सेवेच्या परीक्षेत संपूर्ण देशातून ७६ वा नंबर पटकावत अखिल भारतीय स्तरावर सिंधुदुर्गचा टॅलेंटचा झेंडा रोवणारा दाभोली गावचा सुपुत्र वसंत दाभोलकर तसेच बारावीतील सानिकाकुमारी यादव, सिद्धी भिडे, ऋतुजा उगवेकर, मंगल शेणई, विश्ववेता वारंग, ऋग्वेदी नार्वेकर तर दहावीतील प्रतिक्षा नाईक, परी सामंत, सानिका सावंत, तृषा वारंग, हर्षाली परुळेकर, रूचिरा बागायतकर, संस्कृती नाईक यांचा शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्याधिकारी परितोष कंकाळ, कलावलय संस्थेचे अध्यक्ष बाळू खामकर, रामेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दाजी परब, रविद्र परब, मानकरी सुनिल परब, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, मंडळाचे संस्थापक सदस्य अजित राऊळ, मंडळाचे अध्यक्ष साबाजी परब, मंगेश परब, प्रसाद दाभोलकर आदी उपस्थित होते.

          यु.पी.एस.सी., एम.पी.एस.सी., आय.पी.एस. या सारख्या स्पर्धा परीक्षात येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने नगरवाचनालय संस्था व न.प.यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र नियोजित आहे. या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास ऑनलाईन पद्धतीनेही करता येतो. या भागातील टॅलेंटपणा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसंत दाभोलकर हे मार्गदर्शक आहेत. त्यामुळे स्पर्धा परीक्षेस बसण्याची तयारी करा. त्यात तुम्हाला निश्चितच यश मिळेल असे प्रतिपादन मुख्याधिकारी कंकाळ यांनी केले. आपल्याला यु.पी.एस.सी. मुलाखतीत दशावतार, कासव याबद्दलही प्रश्न विचारले होते. त्याची मी निर्भिडपणे उत्तरे दिली. कारण आपल्या भागातील विविध गोष्टींची माहिती करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी वक्तृत्व स्पर्धाच विद्यार्थ्यांना निर्भिड बनवत असल्याचे वसंत दाभोलकर याने सांगितले. प्रास्ताविक अजित राऊळ यांनी तर निवेदन काका सावंत यांनी मानले. यानंतर मत्स्यभेदहा संयुक्त नाट्य प्रयोग संपन्न झाला.

Leave a Reply

Close Menu