► पावसाच्या आगमानाने सर्वत्र समाधानाचे चित्र

बरेच दिवस हुलकावणी देणा-या पावसाने आज शहरासह तालुक्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतक-यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

पावसाळी हंगाम सुरु झाला तरी यावर्षी पाऊस पडण्याची चिन्हेच दिसत नव्हती. ऐन जूनमध्ये पडणा-या कडक उन्हामुळे एप्रिल-मे महिना असल्यासारखीची परिस्थिती निर्माण झाली होती. जूनचा अर्धाअधिक महिना संपला तरी पाऊस काही पडत नव्हता. कडक उन्हामुळे घामाच्या धाराच्या धारा वाहत होत्या. शेतकरी तर आभाळाकडे नजर लावूनच होता. दरम्यानशुक्रवारी सायंकाळी हजेरी लावून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने आज शनिवारी सकाळपासूनच बरसायला सुरुवात केली आहे. या पावसामुळे काहीसा गारठा निर्माण झाला आहे. तर शेतीच्यादृष्टीने शेतक-यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Leave a Reply

Close Menu