►श्री रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह ४ पासून

वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्री देव रामेश्वराचा अखंड भजनी सप्ताह ४ ते ११ जुलै या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त ४ जुलै रोजी स.९ वा. सप्ताहाची सुरुवात झाल्यानंतर रोज अष्टोप्रहर भजने, रामेश्वर व राम मंदिरात पौराणिक कथांवर आधारित देखावे, स्थानिक कलाकारांची रांगोळी प्रदर्शने असे कार्यक्रम होणार आहेत.

      तर दि.४ रोजी ७ वा.-विठ्ठल पंचायतन सांप्रदाय-सुरंगपाणी, रात्रौ ८.३० वा. दत्तप्रासादिक भजन मंडळ कुबलवाडा, दि.५ रोजी सायं.७ वा. अचानक भजन मंडळ, रात्रौ ८.३० वा.ब्राह्मण भजन मंडळ-भेंडमळा, दि.६ रोजी सायं.७ वा.ओमकार भजन मंडळ आडारी, रात्रौ ८.३० वा. मुळपुरुष भजन मंडळ-वडखोल, दि.७ रोजी सायं.७ वा. जनता सेवा भजन मंडळ-परबवाडा, रात्रौ ८ वा.ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ नमसवाडी, दि.८ रोजी सायं.७  वा. वाटोबा भजन मंडळउभादांडा, रात्रौ ८.३० वा. देऊळवाडा भजन मंडळ-वेंगुर्ला, दि. ९ रोजी सायं. ६ वा.श्री रामेश्वर संयुक्त संगित भजन मंडळ-वेंगुर्ला, रात्रौ ८ वा.बागायतवाडी भजन मंडळ-शिरोडा, दि. १० रोजी सायं.६ वा. ब्राह्मण प्रासादिक भजन मंडळ रेडी, रात्रौ ८.३० वा.धावडेश्वर भजन मंडळ-कॅम्प या मंडळांची भजने होणार आहेत. दि.१० रोजी रात्रौ १२ वा.दिडी, दि.११ रोजी स.१० वा.रामेश्वर पालखी प्रदक्षिणा, दुपारी १२ वा. काल्याने सप्ताहाची सांगता. त्यानंतर गावाच्या कल्याणासाठी गा­हाणे घालण्यात येणार आहे. भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे केले आहे.

      श्रावण महिन्यातील वरदशंकर पुजेची नावनोंदणी ही सप्ताहाच्या पहिल्या दिवसापासून केली जाणार आहे. याची भाविकांनी नोंद घ्यावी.

Leave a Reply

Close Menu