गव्हर्निग काऊन्सीलच्या स्विकृत सदस्यपदी अॅड.नंदन वेंगुर्लेकर

   महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चर या महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, सेवा, कृषी क्षेत्राच्या शिखर संस्थेच्या गव्हर्निग काऊन्सील (कार्यकारिणी समिती)च्या स्विकृत सदस्यपदी आधार फाऊंडेशन सिधुदुर्गचे सचिव तसेच वेंगुर्ला येथील सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संस्थांवर पदाधिकारी असलेले अॅड.नंदन वेंगुर्लेकर यांची नियुक्ती केली आहे. तशा आशयाचे पत्र अध्यक्ष ललित गांधी यांनी अॅड. वेंगुर्लेकर यांना दिले आहे.

        महाराष्ट्र चेंबर तर्फे व्हिजन २०२७ हा महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप बनविला असून त्याच्या माध्यमातून आपल्या विभागातील व्यापार-उद्योग, कृषी व सेवा क्षेत्राच्या विकासासाठीच्या योजनांच्या यशस्वीतेसाठी सक्रीय सहभाग नोंदविणे, विविध व्यापार-उद्योग क्षेत्राच्या स्थानिक संघटना, संस्था यांच्याशी समन्वय ठेवणे, चेंबरच्या शतकमहोत्सवी सभासद योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळवून देणे या जबाबदा­या अॅड. वेंगुर्लेकर यांना देण्यात आल्या आहेत. या नियुक्तीबद्दल अॅड.नंदन वेंगुर्लेकर यांचे अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Close Menu