चेंबर ऑफ कॉमर्सच्या उपाध्यक्षपदी डॉ.दीपक परब

  महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स या संस्थेला विविध क्षेत्रांमध्ये नावलौकिक मिळवण्यासाठी मसुरे-चांदेर गावचे सुपुत्र आणि मुंबईचे प्रसिद्ध उद्योजक डॉ.श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले होते. याची दखल घेऊन त्यांची महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चरच्या उपाध्यक्षपदी (कोकण विभाग) निवड करण्यात आली. या निवडीनंतर महाराष्ट्र चेंबर कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी आणि कल्लाप्पा आण्णा, जनता सहकारी बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते डॉ दीपक परब यांचा सत्कार करण्यात आला. उद्योग क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत असणा­या या संस्थेला भविष्यामध्ये सर्वांच्या सहकार्यातून व मार्गदर्शनातून कोकण विभागातून जास्तीत जास्त संस्थेचे सभासद करण्याचा आणि या संस्थेला गर्व वाटेल असे काम करण्याचा मानस नूतन उपाध्यक्ष डॉ. दीपक परब यांनी व्यक्त केला. डॉ. दीपक परब यांच्या निवडी बद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर, मसुरे ग्रामस्थ, विविध पक्षांचे लोकप्रतिनिधी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Close Menu