अनन्या प्रसाद महाले

  अनन्या ही उभादांड्याच्या स्व. श्रीकांत आणि स्व. विजया महाले ह्यांची नात. नेहेमीच्या सरधोपट करिअरच्या मागे न लागता काहीतरी वेगळं करायचं हे तिने केव्हाच ठरवलं होतं. आणि म्हणूनच, सीबीएसइ बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत 90% गुण मिळवून अनन्या प्रसाद महाले, हिने मुंबईच्या सेेंट झेवियर्स महाविद्यालयात कला शाखेचा अभ्यासक्रम निवडला आणि पाच वर्षां नंतर Psychology-Anthropology ह्या विषयात फर्स्ट क्लास मिळवून अनन्याने ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. तिला लहानपणा पासूनच प्राण्यांसोबत काम करायचंय – Animal Behaviour & Welfare ह्या क्षेत्रात तिला पुढे शिक्षण घ्यायचं आहे आणि त्या दृष्टीने ती पुढची पावलं उचलत आहे. सेेंट झेवियर्स महाविद्यालयातून पदव्युत्तर होणारी अनन्या ही त्यांच्या कुटुंबातील तिसरी पिढी आणि सहावी सदस्य. अनन्याची आई अर्चना महाले ही सुद्धा सेेंट झेवियर्सचीच विद्यार्थीनी. लहानपणी उभादांड्याच्या आजीच्या अंगणात खेळता खेळता तिला कुत्रे, मांजरी अशा प्राण्याचा लळा लागला. प्राण्यांकडे, निसर्गा कडे बघण्याचा योग्य दृष्टिकोन मिळाला. मनुष्य हा सृष्टीचा स्वामी नसून आपण सारे ह्या निसर्गाचाच एक अविभाज्य भाग आहोत आणि म्हणूनच ह्या सृष्टीची जपणूक झाली पाहिजे, हे बाळ कडू अनन्याला आजीच्या अंगणात मिळालं. आणि तेच घेऊन आता तिची पदव्युत्तर शिक्षणासाठी पुढची वाटचाल सुरू झाली आहे. तिच्या या उत्तुंग यशाच्या वाटचालीसाठी किरात परिवारातर्फे शुभेच्छा.

Leave a Reply

Close Menu