डॉ. दीपक परब यांना कोकण आयडॉल पुरस्कार

कोकण भूमी प्रतिष्ठान, कोकण क्लब, कोकण बिझनेस फोरम, ग्लोबल कोकण या संस्थेतर्फे देण्यात येणारा कोकण आयडॉल सन्मान 2023 पुरस्कार मसुरे चांदेरवाडीचे सुपुत्र आणि मुंबई येथील प्रसिद्ध उद्योजक डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब यांना जाहीर झाला आहे. 16 जुलै रोजी प्राचार्य बी. एन. वैद्य सभागृह, दादर-मुंबई येथे कोकम व्हिजन परिषदेत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अन्य प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. परब यांना हा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. डॉ. परब यांच्या आजवरच्या सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कला, क्रीडा, कृषी, पर्यटन आदी क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.  डॉ. दीपक परब हे श्री स्वामी समर्थ येयर फ्राईट प्रायव्हेट लि., कोकण ऍग्रो प्रा. लि. या कंपनीचे संचालक असून उद्योग क्षेत्रात मुंबई तसेच सिंधुदुर्ग मध्ये त्यांचे मोठे नाव आहे.

 

Leave a Reply

Close Menu