नगरवाचनालयात बालकुमार ज्ञानकोपरा

वाचन संस्कृती जोपासणे, वाढविणे हे वाचनालयाचे ध्येय मानून नगर वाचनालय वेंगुर्ला ही संस्था वेळोवेळी उपक्रम राबवित असते. मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, वाचन संस्कृतीपासून दूर चाललेल्या युवा पिढीस वाचनालयाकडे आकर्षित करण्यासाठी नगर वाचनालय वेंगुर्लातर्फे बालकुमार ज्ञानकोपरा सुरू करण्यात आला. याचे उद्घाटन संस्थेचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर यांच्या हस्ते झाले.

       वाचनाची आवड ही बालपणापासून मुलांमध्ये आपण निर्माण केली पाहिजे. मुलांना छोट्या छट्या गोष्टी सांगणे, त्यांना बालवाङ्मय वाचावयास आपण प्रवृत्त केले पाहिजे. वाचनाने आपल्या ज्ञानात भर पडते. विद्यार्थ्यांनी वाचनालयातील पुस्तकांचे, ग्रंथांचे नेहमी वाचन करावे. यूपीएससी व एमपीएससीसारख्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके वाचनालयात आहेत. त्यांचा विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावा असे आवाहन शांताराम बांदेकर यांनी केले. प्रास्ताविक कार्यवाह कैवल्य पवार यांनी केले. मुलांना वाचनाचा छंद लागला पाहिजे. त्यांच्या पुढील वाटचालीस वाचनाने योग्य दिशा मिळेल. मुलांनी संस्थेच्या बालकुमार ज्ञानकोप­याचा फायदा घ्या असे श्री.पवार यांनी सांगितले. यावेळी रा.सी.रेगे ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी उपलब्ध विविधांगी पुस्तकांचे वाचन केले. याप्रसंगी प्रा.महेश बोवलेकर व प्रा.विलास गोसावी आदी उपस्थित होते. उपकार्यवाह माया परब यांनी आभार मानले.

 

Leave a Reply

Close Menu