वृक्षारोपण करून कांदळवन दिन साजरा

 वेंगुर्ला येथे २६ जुलै रोजी आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासन वन विभाग कांदळवन कक्ष मालवण, कांदळवन प्रतिष्ठान महाराष्ट्र व कांदळवन सहव्यवस्थापन समिती मांडवी-वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने वनक्षेत्रपाल, कांदळवन कक्ष मालवणचे प्रदिप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मांडवी खाडी किनारी परिसरात कांदळवन प्रजातीचे वृक्षारोपण करून कांदळवन दिन साजरा करण्यात आला. यावेळी मठ वनपाल सावळा कांबळे, तुळस वनरक्षक विष्णू नरळे, कांदळवन कक्ष वेंगुर्ला वनरक्षक दत्ता मुकाडे, यूएनडीपी,जीसीएफ प्रकल्प जिल्हा समन्वयक अधिकारी, सिंधुदुर्ग  रोहित सावंत, सिंधुदुर्ग कांदळवन प्रतिष्ठानचे उपजीविकातज्ज्ञ केदार पालव, वेंगुर्ला प्रकल्प समन्वयक अमित रोकडे, जागृती गवंडे, शुभम कांबळे, दिगंबर तोरसकर, कांदळवन सहव्यवस्थापन समिती सदस्य आणि स्वामिनी महिला बचत गट सदस्य श्वेता हुले, आयेशा हुले, स्नेहा खोबरेकर, सुशीला हुले, प्रियांका दाभोलकर, गौतमी हुले आदी उपस्थित होते. तसेच कांदळवन दिनाच्या औचित्याने तालुक्यातील कांदळवन सहव्यवस्थापन समितींच्या सहभागातून विविध उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये टाक येथील कांदळवन समितीच्यावतीने वृक्षारोपण व कांदळवन परिसर स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. तर शालेय विद्यार्थ्यांना कांदळवनाचे महत्त्व, संरक्षण व संवर्धन बाबत विविध जनजागृतीपर चित्रफिती दाखवून प्रबोधन केले.

 

Leave a Reply

Close Menu