भित्तीपत्रकांतून साहित्य व निसर्गाची माहिती

बॅ.बाळासाहेब खर्डेकर यांच्या जयंतीनिमित्ताने बॅ.खर्डेकर महाविद्यालयातील इंग्रजी विभागामार्फत साहित्य व निसर्गयावर भित्तीपत्रकाचे आयोजन केले होते. उद्घाटन प्राचार्य डॉ. आनंद बांदेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रा.डॉ.विलास देऊलकर, नॅक समन्वयक प्रा.एस.एच.माने, नॅक सल्लागार समिती सदस्य प्रा.बी.एम.भैरट, इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.एम.एम.मुजुमदार, तत्त्वज्ञान विभाग प्रमुख डॉ.एस.एस.भिसे, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख जे.वाय.नाईक, प्रा.के.आर.कांबळे व महाविद्यालयातील इतर प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या भित्तीपत्रकांसाठी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.एम.एम.मुजुमदार व डॉ.बी.जी.गायकवाड यांचे विद्यार्थाना मार्गदर्शन लाभले आणि भित्ती पत्रकासाठी इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.

 

Leave a Reply

Close Menu