‘प्रवास दत्तमाऊलीचा‘ अंतर्गत वृक्षारोपण

            दशावतार कला आणि कलाकार संवर्धन करण्याच्या दृष्टीने स्थापन झालेल्या सिधुदुर्गातील दत्तमाऊली दशावतार लोककला शिक्षण प्रशिक्षण बहुउद्देशीय मंडळाला २० ऑगस्ट रोजी तीन वर्षे पूर्ण होत आहेत. प्रवास दत्तमाऊलीचा, सोहळा त्रैवर्ष पूर्तीचाअंतर्गत विविध उपक्रम घेण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून मातोंड न्यू इंग्लिश स्कूल येथे दशावतारातील अष्टपैलू कलावंत कै.राजन गावडे आठवण सहवासाची अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. मंडळातर्फे सुमारे २५ झाडे वृक्षारोपणासाठी भेट देण्यात आली. यावेळी मुंबई कमिटी सदस्य रावजी परब, स्कूलमधील एस.एस.घाडी, डी.ई.सारंग, एस.बी.चांदणे, पी.एस.सावळ, ए.यु.पाटील, मुख्याध्यापक व्ही.पी.मांजलकर, विद्यार्थी व दत्तामाऊली मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. डी.ई.सारंग यांनी वृक्ष संवर्धानाचा विश्वास देऊन उपस्थितांचे आभार मानले.

   दरम्यान, या मंडळातर्फे ३ ऑगस्ट रोजी खुडास केळूस व मळई शाळांमधील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप होणार आहे. तसेच पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी आणि अकरावी व बारावी या इयत्तेत शिकणा­यांनी दशावतार लोककला‘, ‘दशावतारातील एक आठवण‘, ‘दशावतार कलेतील तुमचा आवडता कलाकारयापैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे. ८ ऑगस्ट रोजी सर्व शाळा व महाविद्यालयांमधून संबंधित शिक्षक ही स्पर्धा घेणार आहेत. विद्यार्थ्यांनी लिहिलेले निबंध त्याच दिवशी संबंधित शिक्षक मंडळाकडे व्हॉटस अॅपच्या माध्यमातून सुपूर्द करतील. स्पर्धेतील तिन्ही गटांतील प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे १०००, ७०० व ५०० अशी बक्षिसे देण्यात येतील. दि. १० ऑगस्ट रोजी मठ स्वयंभू मंगल कार्यालयात आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. दि. १३ ऑगस्ट रोजी मठ स्वयंभू मंगल कार्यालयात एकदिवशीय दशावतार प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रवेश मर्यादा ३० असून यामध्ये यशवंत तेंडोलकर, प्रशांत मेस्त्री, पपू नांदोसकर, दामोदर जोशी, कांता मेस्त्री, आनंद नार्वेकर, पपू घाडीगांवकर, चंद्रकांत खोत व हरेश नेमळेकर हे प्रशिक्षण देणार आहेत. प्रशिक्षणानंतर सहभागींकडून त्याचे सादरीकरण करून घेऊन त्यातील उत्कृष्ट भूमिका करणा­यांना रोख बक्षिसे दिली जातील. हा कार्यक्रम सकाळी ९ ते ५ या वेळेत होणार आहे.

   दि. २० ऑगस्ट रोजी मठ स्वयंभू मंगल कार्यालयात दत्तमाऊली संस्थेचा त्रैवर्ष पूर्ततेचा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी ऑनलाईन निबंध स्पर्धा व प्रशिक्षणार्थी बक्षिस वितरण, जितेश भगत (निवती) व जयेश कोनकर यांच्या धाडसाचा सन्मान, पाल येथील खाजणादेवी या प्राथमिक शाळेतील मनस्वी पेडणेकर हिचा दत्तक योजनेंतर्गत सन्मान, दशावतार पुरस्कार वितरण सोहळा व सायंकाळी जिल्ह्यातील नामवंत नवोदित कलाकरांच्या संचात संयुक्त दशावतार नाटक होणार आहे. सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन मंडळातर्फे अध्यक्ष बाबा मयेकर यांनी केले आहे. स्पर्धांच्या अधिक माहितीसाठी दत्तप्रसाद शेणई (९४२०२०७४०८), मोरेश्वर सावंत (९४२१२६१७३०) आणि रुपेश नेवगी (८२७५६६३७४४) यांच्याशी संफ साधावा.

Leave a Reply

Close Menu