पाककला स्पर्धेत रसिका पाटकर प्रथम

आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिनाचे औचित्य साधून भटवाडी शाळा नं.२ येथे  पालकांसाठी आयोजित केलेल्या तृणधान्यांपासून पौष्टिक पदार्थांवर पाककला  स्पर्धेत प्रथम-रसिका पाटकर (नाचणीचा हलवा), द्वितीय-प्राजक्ता आपटे (वरीची खांडवी) व अस्मिता म्हापणकर (वरीचा उपमा), तृतीय- स्वप्नाली तेली (नाचणीचे लाडू) यांनी क्रमांक पटकाविले. स्पर्धेचे परिक्षण सीमा मराठे व प्रविण सातार्डेकर यांनी केले. यावेळी शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, मार्गदर्शक सुरेश जोशी आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक परब यांनी आभार मानले. मुलांना तृणधान्य ओळखता यावीत यासाठी त्याबद्दलची माहिती व प्रदर्शन भरविण्यात आले होते.

Leave a Reply

Close Menu