मातोंड भजन स्पर्धेत कलेश्वर पूर्वीदेवी मंडळ प्रथम

मातोंड येथील श्री देव रामेश्वर अखंड भजनी हरिनाम सप्ताहानिमित्त येथील समस्त गावकर मंडळी, देवस्थान कमिटी व श्री देवी सातेरी युवक कला-क्रीडा मंडळ यांच्यावतीने आयोजित केलेल्या आमंत्रित नवोदित बुवांच्या संगीत भजन स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. स्पर्धेत श्री कलेश्वर, पूर्वीदेवी भजन मंडळ वेत्ये यांनी प्रथम, श्री रवळनाथ नवतरुण भजन मंडळ, ओटवणे यांनी द्वितीय, गोठण प्रासादिक भजन मंडळ वजराठ यांनी तृतीय तर उत्तेजनार्थ प्रथम सिद्धेश्वर सातेरी भजन मंडळ तळवडे, तर द्वितीय इसोटी भजन मंडळ, मातोंड-सावंतवाडा यांना मिळाला. तसेच उकृष्ट गायक म्हणून बुवा आत्माराम कवठणकर (ओटवणे), उकृष्ट पखवाज वादक म्हणून सागर वारखंडकर (वेत्ये), उकृष्ट तबला वादक समीर धुरी (वजराट), उकृष्टझांजवादक शिवराम सावंत (मातोंड), उकृष्ट कोरस क्षेत्रपाळेश्वर भजन मंडळ, होडावडा, शिस्तबद्ध संघ जय भवानी भजन मंडळ, तळवडे- बादेवाडी यांना मिळाला. या स्पर्धेचे परिक्षण पखवाज अलंकार मनिष तांबोस्कर व प्रसिद्ध भजनी बुवा पुरुषोत्तम परब यांनी काम पाहिले. विजेत्या स्पर्धकांना सामाजिक कार्यकर्ते देवा कांबळी, सोसायटी संचालक रविद्र नाईक, तबला वादक बाळू कांडरकर, माजी उपसरपंच सुभाष सावंत, सामाजिक कार्यकर्ते महेश वडाचेपाटकर, प्रमुख गावकर रविकिरण परब, विजय परब (म्हालटकर), संदिप परब (म्हालटकर), रूपक मातोंडकर, मातोंडचे प्रसिद्ध भजनी बुवा विशाल घोगळे, सचिन सावंत यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार दिपेश परब यांनी केले.

Leave a Reply

Close Menu