‘बीज अंकुरे अंकुरे‘चे प्रकाशन

कोमसाप मालवणच्या बीज अंकुरे अंकुरेया पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मालवण येथील बॅ.नाथ पै सेवांगणच्या दादासाहेब शिखरे सभागृहात २ सप्टेंबर रोजी कोमसापचे आद्य संस्थापक तथा पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते तर या पुस्तकाच्या ई-आवृत्तीचे प्रकाशन रविंद्र वराडकर यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपिठावर मालवणी कवी रूजारिओ पिटो, डॉ.विनायक करंदीकर, शिक्षणमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक रामचंद्र आंगणे, ज्येष्ठ साहित्यिक रविद्र वराडकर, बॅ.नाथ पै सेवांगणचे कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, आचरे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अशोक कांबळी, ‘सत्त्वश्रीप्रकाशनचे प्रकाशक अनिकेत कोनकर, ‘बीज अंकुरे अंकुरेचे प्रकाशक सुरेश ठाकूर आदी उपस्थित होते. कोमसाप ही संस्था कोकणातील उदयोन्मुख आणि प्रतिथयश साहित्यिकांसाठी स्थापन झाली. लिहित्या हातांनी केलेली साहित्य निर्मिती वाचक रसिकांसाठी प्रकाशात आणावी आणि आधीच साहित्यसंपन्न असलेल्या कोकणातील नव्या साहित्य उन्मेषांमुळे या भूमीची सांस्कृतिक संपन्नता वर्धिष्णू व्हावी हा परिषदेचा मूळ हेतू सुरेश ठाकूर यांनी या पुस्तकाच्या प्रकाशनातून साध्य केला असल्याबद्दल श्री.कर्णिक यांनी गौरवोद्गार काढले. पालघर ते सिधुदुर्गपर्यंत कोमसापच्या असलेल्या ६७ शाखांमधून ४० लिहित्या हातांना एकत्र करून दोन पुस्तके प्रकाशित करण्याची किमया मालवण शाखेने साध्य केली. ही गोष्ट निश्चितच लक्षवेधक असल्याचे रूजारिओ पिटो यांनी सांगितले. डॉ. विनायक करंदीकर यांनी वि.स.खांडेकर यांचे जीवनचरित्र आणि कोमसापची वाटचाल यावर मार्गदर्शन केले. सुरेश ठाकूर यांनी आपल्या सोबत आपल्या सदस्यांनाही पुस्तक निर्मितीची जी संधी उपलब्ध करून दिली, ती खरीच मार्गदर्शक असल्याचे रामचंद्र आंगणे म्हणाले. सुरेश ठाकूर यांनी सदर पुस्तक निर्मितीची कुळकथा सांगून कोमसाप मालवणच्या पेरते व्हाया नव्या लिहित्या हातांची ही अक्षर निर्मिती असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Close Menu