फुलपाखरु उत्सवातून उलघडले फुलपाखरांचे जीवनमान

 माझी वसुंधरा ४.०‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदग्रीन नेचर क्लबबॅ.खर्डेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मधुसुदन कालेलकर सभागृहात घेण्यात आलेल्या फुलपाखरू उत्सवात प्रि. एम.आर. देसाई इंग्लिश मिडीयम स्कूलच्या लहान विद्यार्थीनींनी फुलपाखरांच्या वेशभूषेसह नृत्य करीत उपस्थितांची मने जिकली.

      फुलपाखरांच्या प्रजातींची विविधता समजून घेणेफुलपाखरांची वैज्ञानिक मोजणी कशी करावी याची माहिती देणेफुलपाखरांचा मधुरस आणि खाद्य वनस्पतींचे संवर्धन करणे या उद्देशाने फुलपाखरू उत्सवाचे आयोजन केले होते. यानिमित्त फुलपाखरांच्या प्रतिकृतींनी हा परिसर सुशोभित केला होता. बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी नितीन कवठणकर व करिष्मा मोहिते यांनी वेंगुर्ल्यात आढळणा-या फुलपाखरांच्या विविधतेबद्दलत्यांच्या नोंदी व संवर्धनाबद्दल मार्गदर्शन केले.

      यावेळी मुख्याधिकाी परितोष कंकाळनगरपरिषदेच्या पर्यावरण दूत डॉ.धनश्री पाटीलस्वच्छता ब्रॅण्ड अॅम्बेसडर प्रा.सुनिल नांदोसकरमाजी नगराध्यक्ष दिलीप गिरपप्रशासकीय अधिकारी संगीता कुबलमाजी नगरसेवक प्रशांत आपटेसुहास गवंडळकरश्रेया मयेकरसुषमा खानोलकरपत्रकार के.जी.गावडेदाजी नाईकदिपेश परब यांच्यासह खर्डेकर कॉलेजवेंगुर्ला हायस्कूलपाटकर हायस्कूलतालुका शाळा नं.१ व ४वडखोल शाळा यांचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार वैभव म्हाकवेकर यांनी मानले.  याच कार्यक्रमात केंद्र शासनामार्फत इंडियन स्वच्छता लीग – सीझन २‘ ही स्पर्धा आयोजित केली असून यात वेंगुर्ला नगरपरिषदेने वेंगुर्ला आयकॉनस‘ नावाने सहभाग घेतला आहे. याचाही शुभारंभ वसुंधरा शपथ घेऊन करण्यात आला.

Leave a Reply

Close Menu