विकास कामांचा आढावा घेणा-या पुस्तिकेचे प्रकाशन

सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शिवसेना-भाजपा युती सरकारच्या माध्यमातून आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यात केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेणारी विकास अहवाल पुस्तिका गुरुवारी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते व उद्योजक भैया सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ला येथे प्रकाशित करण्यात आली.

      राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत हे आपल्या वेंगुर्ला-भटवाडी येथील निवासस्थानी गणेशोत्सव निमित्त आले होते. यावेळी या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. वेंगुर्ला शहर व वेंगुर्ला तालुका अशा दोन पुस्तिकांमधून शहरातील व तालुक्यातील दीपक केसरकर यांच्या माध्यमातून व प्रयत्नातून मंजूर झालेली तसेच पूर्णत्वास आलेली सर्व विकास कामांची परिपूर्ण माहिती या पुस्तिकेत देण्यात आलेली आहे. तसेच गणेश चतुर्थीच्या आरत्यांचा संग्रह सुद्धा या पुस्तिकेत आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकरवेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकरशहरप्रमुख उमेश येरमतालुका समन्वयक बाळा दळवीमितेश परब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu