‘वेंगुर्ला आयकॉनस्‘ने राबविली कांदळवन स्वच्छता मोहिम

           केंद्र शासनामार्फत इंडियन स्वच्छता लीग-सीझन २‘ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने वेंगुर्ला आयकॉनस्‘ या नावाने सहभाग घेतलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेने १७ सप्टेंबर रोजी मांडवी खाडी येथे कांदळवन स्वच्छता मोहिम राबविली.

      मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. डॉ.धनश्री पाटील यांनी कांदळवनाचे महत्त्व सांगून त्याचे जतन व संवर्धन करण्याची गरज असल्याचे सांगितले. माजी नगराध्यक्ष दिलीप गिरपस्वामिनी महिला बचत गटाच्या श्वेता हुलेरोट्रॅक्ट क्लबचे प्रितेश लाड यांनी मनोगत व्यक्त केले. मांडवी खाडीमधील कांदळवनामध्ये जमा झालेले प्लास्टिक व  इतर  कचरा  नौकेमधून गोळा करण्यात आला तसेच मांडवी जवळील परिसराची देखील स्वच्छता करण्यात आली.

      जल बांदेश्वर येथील झुलता पुल व नवाबाग समुद्र किनारा येथे गणेश चतुर्थी निमित्त मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. यामुळे सदर ठिकाणी  कच-याचे प्रमाण वाढले आहे. या अनुषंगाने वेंगुर्ला आयकॉनस्च्या टीमने स्थानिक मच्छिमार बांधवांना सोबत घेऊन त्या ठिकाणचा कचरा गोळा करून परिसराची साफ सफाई केली. या स्वच्छता मोहिमेअंतर्गत अंदाजे ५०० किलो एवढा कचरा संकलित करण्यात आला. 

        या स्वच्छता मोहीमेत मुख्याधिकारी परितोष कंकाळप्रशासकीय अधिकारी संगीता कुबलटीम कॅप्टन डॉ. धनश्री पाटीलमाजी नगराध्यक्ष दिलीप गिरपमाजी नगरसेवक प्रशांत आपटेस्वामीनी महिला बचत गटाच्या श्वेता हुलेरोट्रॅक्ट क्लबचे प्रितेश लाडमच्छिमार नेते गणपत केळुस्कर,   पत्रकार भरत सातोस्करविनायक वारंग तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारीबॅ. खर्डेकर महाविद्यालय व ग्रीन नेचर क्लबचे विद्यार्थीस्वामीनी महिला बचत गटाच्या महिला व स्वच्छता प्रेमी आणि वेंगुर्लावासीयांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार नगरपरिषदेचे अधिकारी वैभव म्हाकवेकर यांनी केले.

Leave a Reply

Close Menu