वेंगुर्ल्यात उद्या‘रंग-अंतरंग‘चे प्रकाशन

  प्रसिद्ध लेखिका श्रुती संकोळ्ळी यच्या रंग-अंतरंगया पुस्तकाचा प्रकाशन सोहळा उद्या (दि.१) सायंकाळी ४ वाजता साई डिलक्स हॉल, वेंगुर्ला येथे होणार आहे. रंग-अंतरंगया पुस्तकाच्या पहिल्या भागात लेखिका श्रुती संकोळ्ळी यांच्या आठवणी, अनुभव यावर आधारित प्रकाशित झालेले लेख तर दुस-या भागात किरात साप्ताहिकाच्या माध्यमातून मन सुद्ध तुजंया सदरामध्ये प्रकाशित झालेले लेख आहेत.

        या पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ.रूपेश पाटकर व ज्येष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित रहाणार आहेत. प्रकाशन सोहळ्यानंतर पुस्तकातील निवडक लेखांचे अभिवाचन व लेखिका श्रुती संकोळ्ळी यांच्याशी मनमोकळा संवाद साधला जाणार आहे. तरी यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन किरात ट्रस्ट व किरात परिवार यांनी केले आहे.

 

 

 

 

 

Leave a Reply

Close Menu