‘एक तारीख, एक तास स्वच्छता मोहिमे‘ला अभूतपूर्व प्रतिसाद

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमत्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्यावतीने रविवारी आयोजित केलेल्या एक तारीखएक तास स्वच्छता मोहिमेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या मोहिमेंतर्गत शहरातील मार्केटहॉस्पिटल नाकाकॅम्पबंदर रोडबसस्थानकवेशी भटवाडीखांबड भटवाडीआनंदवाडीरामघाट रोडदाभोली नाका आदी ठिकाणचा परिसर स्वच्छ करण्यात आला.

      या मोहिमेत नगरपरिषद कर्मचारीभाजी विक्रेतेबॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थीस्वामिनी बचत गटाच्या महिला व स्थानिक मच्छिमारबस स्थानकाचे आगारप्रमुखचालकवाहकहोमिओपॅथीक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी व प्राध्यापकबालगणेश मंडळाची मुलमाजी नगरसेवकसखी बचत गटलक्ष्मी बचतगौरी बचत गटदीप्ती बचत गट,  एकता बचत गटराजकीय पक्षांचे पदाधिकारीरोटरी क्लब व इनरव्हील क्लबचे सदस्यनानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे स्वयंसेवक व नागरीक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Leave a Reply

Close Menu