अन्याय करून ताज प्रकल्प नको

ठाकरे शिवसेनेतर्फे संपूर्ण राज्यात उद्धव ठाकरे यांनी होऊ दे चर्चाहा उपक्रम गावागावांत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ ऑक्टोबर रोजी ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी सेना नेते गुरूनाथ खोत, सिंधुदुर्ग शिवसेना प्रमुख संजय पडते, जिल्हा समन्वयक बाळा गावडे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख जान्हवी सावंत, उपजिल्हा प्रमुख प्रकाश गडेकर, तालुका यशवंत परब, सरपंच लतिका रेडकर यांसह स्थानिक पदाधिका­यांनी शिरोडा बायपास रोड तिठा येथे हा उपक्रम घेतला.

      देशातील भाजपा सरकारने जनतेला अच्छे दिनाची स्वप्ने दाखवत सत्ता मिळविली. तर बोललेल्या शब्दाप्रमाणे न वागणा­या व सर्वसामान्य जनतेला महागाईच्या बेरोजगारीच्या खाईत ढकलणा­या भाजपास शिवसेनेने याच मुद्यावरून सोडले. या जिल्ह्यातील जनतेच्या कायम स्वरूपी आरोग्य सेवेसाठी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना शासकीय मेडीकल कॉलेज सुरू केले. त्यास तीन वर्षे झाली. आता त्यातून शिक्षण घेऊन डॉक्टर या जिल्ह्यास मिळतील. जनतेशी निगडीत विकास कामे ही शिवसेनेने शब्द दिल्याप्रमाणे पूर्ण केलेली आहेत. शिरोडा वेळागर सर्व्हे नं.३ चा प्रश्न उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खासदार विनायक राऊत यांनी कायम स्वरूपी सोडविला आहे. ही वस्तुस्थिती आहे. शिरोडा-वेळागर येथील २ हेक्टर जमिनीबाबत शेतक­यांचा विरोध आहे. त्यासाठी ताज ग्रुपला खरोखरच विकास करायचा असेल तर शेतक­यांना विश्वासात घेऊन करा. त्यांच्या जमिनींचा योग्य तो मोबदला व योग्य त्या मागण्या पूर्ण करून कराव्यात. त्यासाठी शिवसेना विरोध करणार नाही. पण त्या शेतक­यांवर अन्याय होत असेल तर शिवसेना गप्प बसणार नाही, त्यांच्या पाठीशी ठामपणे राहिल, असे प्रतिपादन संजय पडते यांनी केले.

       देशांत इंडियानावाची आघाडीला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत असल्याने येत्या निवडणुकांत आपल्याला धोका आहे. हे जाणून देशांचे एवढे दिवस इंडियाहे असलेले नाव भारत करण्याचा घाट घातला आहे. मेक इन इंडियाउपक्रम राबविणा-या याच सरकारला आता इंडियानाव का खुपसते हे लक्षात घ्या. भाजपा सरकारने देशांतील जनतेला हेतु पुरस्सर महागाईत लोटले. सर्वसामान्य माणसांचे जीवन उद्धस्त करण्याचे काम केले आहे. आता यांना बुरे दिनकसे असतात हे दाखविण्याची वेळ आली आहे. केवळ घोषणांच्या प्रवसांपेक्षा प्रत्यक्ष काय केलेत ते पाहिले आहे. आता निवडणुकीच्या आधी कांही स्वस्त देण्याचा प्रयत्नही हे करतील पण सत्ता आल्यानंतर दामदुप्पटीने ते सर्व सामान्यांकडून वसुलही करतील असे गुरू खोत यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Close Menu