पाल्याच्या संदेशांनी पालक भारावले

               सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये पालक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने बनविलेले ग्रिटींग कार्ड पालकांना देऊन पालक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या ग्रिटींग  कार्डवर विद्यार्थ्यांना आपल्या पालकांबद्दल काय वाटते याचे कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश लिहिलेले होते. ते संदेश वाचून पालकही भारावून गेले.

      पालकांसाठी आयोजित केलेल्या विविध गुणदर्शनपर कार्यक्रमात नृत्यसमुहनृत्यगीत गायनस्वरचित काव्य वाचन सादर केले. तर ६८ वर्षांच्या आजीने केलेले कोळी नृत्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले. पालक दिनाच्या कार्यक्रमात दरवर्षी प्रशालेच्या पालकांमधून दोन पालकांना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. यावर्षी पालक ईशा मोंडकरपरशुराम वारंग यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष  इर्शाद शेखसंचालक प्रशांत नेरूरकरमुख्याध्यापक मनिषा डिसोजापालक-शिक्षक संघाचे सदस्यशिक्षक शिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालक उपस्थित होते.

        याप्रसंगी इयत्ता दहावीच्या नविन कार्यकारी मंडळाचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या पदाची ओळख करुन दिली. प्रशालेला वेळोवेळी मदत करणा-या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते फुलझाडांचे रोप देऊन आभार व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका  प्रियंका मिसाळ व आभार शिक्षिका धनश्री नाईक यांनी केले.

Leave a Reply

Close Menu