महिलांसाठीच्या निबंध स्पर्धेत निता सावंत प्रथम

शाळा व्यवस्थापन समितीमध्ये कार्य करत असताना महिलांना विचार व्यक्त करण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळावेपुढे त्यांनी यातून सामाजिक क्षेत्रामध्येराजकीय आणि विविध क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवावा या उद्देशाने वेताळ प्रतिष्ठान सिधुदुर्ग व कै.गणेश लक्ष्मण दाभोलकर-मेस्त्री सांस्कृतिक मंच दाभोली यांच्या संयुक्त विद्यमाने शाळा व्यवस्थापन समिती महिला सदस्यांसाठी जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते. यात निता नितीन सावंत (शिरशिगे) यांनी प्रथम क्रमांक पटकाविला.

      ‘मोबाईलचे दुष्परिणाम-आई बाबांसोबत तुटलेला संवाद‘ या विषयावर घेण्यात आलेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातून ७९ स्पर्धकांनी सहभाग घेतला. उर्वरित निकालामध्ये द्वितीय-स्नेहा माणिक चौगुले (कोकीसरे)तृतीय- प्रगती विवेक चव्हाण (वेंगुर्ला)उत्तेजनार्थ-लावण्या लक्ष्मीकांत देसाई (कळणे) व वर्षा किशोर नेरूरकर (वालावल) यांचा समावेश आहे. स्पर्धेचे परिक्षण बॅ.खर्डेकर महाविद्यायाचे मराठी विभाग प्रमुख डॉ.पी.आर.गावडे यांनी केले. विजेत्यांना रोख रक्कम तसेच आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार अरूण दाभोलकर यांची चित्रफ्रेमप्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

Leave a Reply

Close Menu