बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे प्रा.डॉ. विलास देऊलकर यांना भारत सरकार पुरस्कृत संस्था नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी, बेळगावी यांच्याकडून दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या राज्यातून गुणवत्तेवर आधारित निवडक प्राचार्यांना देण्यात येणारा राष्ट्रीय आदर्श प्राचार्य गौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. हा पुरस्कार बेळगांव येथील कार्यक्रमांत मलेशियाच्या उद्योजक महिला स्मिता इंग्रोळे व कोल्हापूरचे महापौर राजू शिंगाडे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आला. प्रा.देऊलकर हे खर्डेकर महाविद्यालयात १२ डिसेंबर २०१४ ते ११ जून २०२३ पर्यंत प्राचार्यपदी कार्यरत होते. या काळात राबविलेले विविध विद्यार्थीभिमुख उपक्रम, महाविद्यालयाचा विकास आदी कामे, प्राचार्य असताना दिलेले योगदान, महाविद्यालयाचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी केलेले प्रयत्न, प्राचार्य म्हणून त्यांचे प्रशासकीय कौशल्य यांचा विचार करून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या कार्यकाळात दोनवेळा नॅक कमिटीतर्फे मूल्यांकन झाले. यात महाविद्यालयाला ‘बी‘ व ‘ए‘ ग्रेड मिळाली होती.