तीन ग्रा.पं.वर भाजपाचा तर एका ग्रा.पं.वर उबाठाचा सरपंच

 वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी, खानोली, मातोंड व पेंडूर या चार ग्रा.पं.च्या निवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी ७७.१९ टक्के एवढे मतदान झाले. चारही ग्रामपंचायतीत मिळून एकूण ६१५२ मतदारांपैकी ४७४९ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान, मातोंड-सुकाळेवाडी येथील ग्रामस्थांना एका राजकीय पक्षाने निवडणुकीपूर्वी त्या वाडीत जाणारा रस्ता करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे जेसीबी वगैरे सामान घेऊन रस्ता करण्यासाठी ते आले असता जमिन मालकाने या कामास विरोध केला. त्यामुळे तो रस्ता होऊ शकला नाही. या कारणाने सुकाळेवाडीतील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार घातला. या वाडीत ७० मते होती.

        या निवडणुकीची मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी झाली. पेंडूर, मातोंड व खानोली ग्रा.पं.वर भाजपा पुरस्कृत सरपंच, तर वायंगणी ग्रा.पं.वर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे सरपंच निवडून आले. यामध्ये भाजपाचे संतोष गावडे (पेंडूर), मयुरी वडाचेपाटकर (मातोंड) व सुभाष खानोलकर (खानोली) तर उबाठाचे दत्ताराम दुतोंडकर (वायंगणी) यांचा समावेश आहे. मातोंड ग्रा.पं. निवडणुकीत एकमेव आर्या रेडकर या बिनविरोध निवडून आल्या होत्या.

    विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – खानोली – सरपंच-सुभाष खानोलकर (२७५), सदस्य-प्रभाग क्र.१-सर्वसाधारण स्त्री-प्रतिभा वरक (९८), अमिता खानोलकर (८४), सर्वसाधारण-सचिन परब (९९), प्रभाग क्र.२-नागरिकांचा मागास प्रवर्ग-बाळकृष्ण मेस्त्री (८६), रूपाली प्रभूखानोलकर (१०९), प्रभाग क्र.३-सर्वसाधारण स्त्री-साधना पवार (१००), सर्वसाधारण-सुनिल घाग (८८)

     वायंगणी-सरपंच-दत्ताराम दुतोंडकर (५१५), सदस्य-प्रभाग क्र.१-नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री-विद्या कांबळी (२५४), सर्वसाधारण स्त्री-दिपाली नांदोसकर (२०९), सर्वसाधारण-अनंत केळजी (३१४), प्रभाग क्र.२-नागरिकांचा मागास प्रवर्ग-महेश मुणनकर (२३५), सर्वसाधारण स्त्री-सविता परब (१९५), सर्वसाधारण-रविद्र धोंड (२६१), प्रभाग क्र. ३-सर्वसाधारण स्त्री-विद्या गोवेकर (२६६), राखी धोंड (२६३), सर्वसाधारण-अनंत मठकर (१९२)

      मातोंड-सरपंच-मयुरी वडाचेपाटकर (८१८), सदस्य-प्रभाग क्र.१-सर्वसाधारण स्त्री-किशोरी परब (३३९), सुजाता सावंत (४३०), सर्वसाधारण-आनंद परब (३७३), प्रभाग क्र.२-नागरिकांचा मागास प्रवर्ग-विशाल बागायतकर (३१२), सर्वसाधारण स्त्री-वैभवी परब (३०९), सर्वसाधारण-दिपेश परब (३४३), प्रभाग क्र.३-अनुसुचित जाती जमाती स्त्री – किरण मातोंडकर (२३२),   आर्या रेडकर (बिनविरोध), सर्वसाधारण-राहूल प्रभू (१८१),

    पेंडूर-सरपंच-संतोष गावडे (६७२), प्रभाग क्र.१ – सर्वसाधारण स्त्री -सुहासिनी वैद्य (१८९), रंजना हर्जी (१८४), सर्वसाधारण-निलेश वैद्य (१९४), प्रभाग क्र.२- नागरिकांचा मागास प्रवर्ग -समिक्षा तांडेल (२३१), सर्वसाधारण स्त्री-सुलोचना परब (२०२), सर्वसाधारण-महादेव नाईक (२५१), प्रभाग क्र. ३-नागरिकांचा मागास प्रवर्ग – दिपक कवठणकर (३३२), सर्वसाधारण स्त्री – प्रणिता सावंत (३१४), सर्वसाधारण – मिलिद गावडे (३४४)

    निकाल जाहिर होताच राजन तेली, प्रसन्ना देसाई, सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, समिर कुडाळकर, शरद मेस्त्री यांनी भाजपाच्या विजयी उमेदवारांचे तर यशवंत परब, संजय गावडे, अजित राऊळ यांसह अन्य पदाधिका­यांनी शिवसेनेच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Close Menu