लक्ष्मी पूजनादिवशी उभादांडा येथे गणपतीची प्रतिष्ठापना

उभादांडा येथील गणपती मंदिराला आगळी वेगळी परंपरा लाभली आहे. या मंदिरात आश्विन कृष्ण अमावस्येला म्हणजेच दिवाळी सणातील लक्ष्मी पूजनादिवशी भल्या मोठ्या गणपतीचे पूजन केले जाते. यावर्षीही ही परंपरा तेवढ्याच उत्साहात जपण्यात आली. लक्ष्मी पूजनादिवशी सायंकाळी ७ वाजता गणपतीची विधीवत प्रतिष्ठापना झाल्यानंतर ख­या अर्थाने येथील गणेशोत्सवाला प्रारंभ झाला आहे. साधारणतः चार ते पाच महिने हा गणपती या मंदिरात विराजमान असणार आहे. या कालावधीत रोज भजने तसेच जागर, फुगड्या, गोफनृत्य, कीर्तन, श्रीसत्यनारायण महापूजा असे कार्यक्रम होणार आहेत. माघ महिन्यात संकष्टी चतुर्थीला गणपतीचा भव्य जत्रौत्सवही साजरा केला जाणार आहे. उभादांडा येथील या आगळ्या वेगळ्या गणेशोत्सवाला भाविकांनी उपस्थित राहून श्रींचे दर्शन घ्यावे व विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन गणपती देवस्थान तर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Close Menu