शहराहस तालुक्यात शुक्रवारी रात्रौ ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी सर्वत्र तुलसी विवाहाची जय्यत तयारी सुरू असताना पावसाळी वातावरण निर्माण झाले. त्यानंतर काही वेळातच पावसाचा शिडकावा झाला. यामुळे तुलसी विवाहाच्या पार्श्वभूमीवर सर्वांची तारांबळ उडाली. परंतु, काही काळातच पावसाने विश्रांती घेतल्याने सर्वांच्या चेह-यावर आनंद दिसला. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावली. सिधुदुर्गात सध्या जत्रौत्सवांचा हंगाम सुरू झाला आहे. अचानक पडलेल्या या पावसामुळे जत्रौत्सवातील दुकानदार, मंदिराचे व्यवस्थापकांसह भाविकांमध्येही चितेचे सुर उमटत आहेत.