संवाद दौर्‍­याला उत्स्फुर्त प्रतिसाद

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष संघटना बळकट करण्याबरोबरच तळागाळातील जनतेशी थेट संफ साधून तेथील प्रश्न, समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याच्यादृष्टीने संवाद दौरा २०२३ अंतर्गत प्रश्नाचे नेते तथा खासदार यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी विधानसभा संफप्रमुख शैलेश परब यांनी साधलेल्या संवाद दौ­यात जेष्ठ शिवसैनिक, युवा सैनिक व महिला कार्यकत्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. तालुक्यातील पदाधिका­यांच्या उपस्थितीत म्हापण जि.प. मतदार संघात दौरा केला.

  वेंगुर्ला तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून सावंतवाडी विधान सभा मतदार संघ संफप्रमुख शैलेश परब यांनी म्हापण जिल्हा परिषद भागात केलेल्या दौ­यात कुशेवाडा, परुळे बाजार, म्हापण, निवती या गावातील पुरुष, महिला कार्यकर्ते, युवा सैनिक यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला व जेष्ठ शिवसैनिकांकडून त्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद घेतले. या संवाद दौ­यात सेनेच्या कार्यकर्त्यांबरोबरच जनतेकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी वेंगुर्ला तालुका संफप्रमुख बाळा चिपकर, तालुका प्रमुख यशवंत परब, महिला तालुका संघटिका सुकन्या नरसुले, शहरप्रमुख अजित राऊळ आणि महिला आघाडी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu