गाबीत समाज विद्यार्थी गुणगौरव

मुंबई-कांजूरमार्ग गाबीत समाजाचा गुणवत्ताधारक विद्यार्थी व पालक सन्मान सोहळा मुंबई महापालिका माजी शिक्षणाधिकारी डॉ.जे.आर.केळुसकर, संस्था अध्यक्ष गणेश फडके, कोकण महोत्सवाचे आयोजक सुजय धुरत, महापौर पुरस्कार प्राप्त शिक्षिका अनुजा पराडकर, जेष्ठ पत्रकार प्रमोद कांदळगावकर, व्यावसायिक उमेश धुरी, खजिनदार रुपेश केरकर, माधुरी बांदकर यांच्या प्रमुख उपस्थितीत यंगबॉईज स्पोर्ट्स क्लब मैदानावर संपन्न झाला. यश मिळेपर्यंत मार्ग सोडणार नाही हा कानमंत्र डॉ.केळुसकर यांनी मुलांना दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष संदेश उपरकर, कोमल केळुसकर, दिक्षा कुबल, सहसचिव उमेश केळुसकर व कार्यकारिणी सदस्य यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Close Menu