सारस्वत बँक वेंगुर्ला शाखेचा 43 वा वर्धापनदिन साजरा

वेंगुर्ला शाखा ही सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेची सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि गोवा येथील पहिली शाखा. सुरुवातीपासूनच ग्राहकांचा विश्‍वास आणि सहकार्य वेंगुर्ला शाखेला लाभले आहे. वेंगुर्लेवासीय आणि परिसरातील ग्राहकांची हक्काची बँक म्हणून सारस्वत बँक आहे याचा आम्हाला अभिमान वाटतो. 43 वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतरही हा विश्‍वास ग्राहकांमुळेच आम्हा सारस्वत बँक टीमला काम करण्याची प्रेरणा देतो. असे प्रतिपादन ब्रँच मॅनेजर श्री. सतीश वाळवे यांनी केले. 29 नोव्हेंबर रोजी सारस्वत बँक, वेंगुर्ला शाखा येथे 43 वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी बँक मॅनेजर सतीश वाळवे बोलत होते. यावेळी संस्थापक श्री. मनमोहन उर्फ बापूसाहेब दाभोलकर, श्री. आना महाले, श्री. वासुदेव झांटये, श्री. दिलीप गिरप, श्री. सुनिल रेडकर, श्रीम. अनुजा तेंडोलकर, श्रीम. सुजाता पडवळ, श्री. परशुराम वारंग, डॉ. प्रभूसाळगावकर, डॉ. उबाळे, श्री. सदानंद बांदेकर, श्री. विजय पांगम, श्री. रमेश पिंगुळकर, श्री. अभिषेक वेंगुर्लेकर, श्री. राजेश शिरसाट, सुभाष दाभोलकर, सुहास सौदागर आदी मान्यवर उपस्थित होते.  वासुदेव नाईक व सुप्रिया सामंत यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती दिली. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.गेली 43 वर्षे सारस्वत बँक वेंगुर्ला शाखा यशस्वी घोडदौड करीत असून वेंगुर्ला शाखेने 200 कोटींचा टप्पा गाठला आहे. सलग दोन वर्षे वेंगुर्ला शाखेने लखपती योजनेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल मान्यवरांनी आपल्या मनोगतात सारस्वत बँक वेंगुर्ला शाखेचे कौतुक व अभिनंदन करत यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बँकेचे झोनल हेड श्री. प्रशांत केळकर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Leave a Reply

Close Menu