देवयानी आजगांवकर यांना सेवामयी शिक्षक पुरस्कार

अखिल भारतीय साने गुरुजी कथामाला शाखा मालवणतर्फे दरवर्षी दिला जाणारा शिक्षणतज्ज्ञ कै.जी.टी. गावकर सेवामयी शिक्षक पुरस्कार (२०२४) सावंतवाडी येथील पेंडूर-पेंढर्‍­याचीवाडी प्राथमिक शाळेच्या उच्चश्रेणी मुख्याध्यापिका देवयानी आजगांवकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम ५००० रुपये, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप असून याचे वितरण ७ जानेवारी २०२४ रोजी शिक्षणतज्ज्ञ कै.जी.टी.गावकर कथानगरी बीडये विद्यामंदिर, केंद्रशाळा आचरे नं.१ या ठिकाणी संपन्न होणार असल्याची माहिती पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष सदानंद कांबळी यांनी दिली. देवयानी त्रिंबक आजगावकर यांनी गेली ३५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये शाळा मुटाट-पाळेकरवाडी, मातोंड-नाटेली, मातोंड बांबर क्र.५, मळेवाड नं.५, धाकोरे नं.१ आदी शाळांमध्ये शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवून शाळा समाजाकडे व समाज शाळेकडे येण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यांच्या ३५ वर्षाच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा विशेष गौरव म्हणून त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे.

Leave a Reply

Close Menu