मालवणी ‘भेरा‘ चित्रपटाची निवड

पिगुळी येथील रहिवासी अभिनेते, लेखक प्रसाद खानोलकर यांच्या ‘साकव‘ या कथेवर आधारित अनिल जाधव पुरस्कृत व श्री वैजप्रभा चित्र निर्मित ‘भेरा‘ या चित्रपटाची चेन्नई येथे होणा­या २१व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ‘इंडियन पॅनोरमा‘ विभागात निवड झाली आहे. कुडाळचे हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्रीकांत भिडे यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड होणारा हा पहिलाच मालवणी चित्रपट आहे. प्रसाद खानोलकर, श्रद्धा खानोलकर, दीपक जोईल, विवेक वाळके, प्रकाश कोयंडे, गौरव राऊळ, श्रीकांत भिडे, नित्यानंद जडये आदी कलाकारांनी यात भूमिका साकारल्या आहेत. 

Leave a Reply

Close Menu