► वेंगुर्ल्यात १ जानेवारी रोजी मंत्राक्षतांची मंगल कलश यात्रा

वेंगुर्ला तालुक्यातील हिदुधर्माभिमानी आणि सर्व रामभक्त मंडळींच्यावतीने ‘श्रीराम जन्मभूमी अयोध्या‘ येथून आलेल्या निमंत्रक मंत्राक्षतांच्या मंगल कलशाची भव्य शोभा यात्रा सोमवार दि. १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.

      येथील ग्रामदैवत श्री देव रामेश्वर मंदिरात सोमवारी सायंकाळी ४ वाजता मंगलकलशाची विधीवत पूजन झाल्यानंतर मंगलकलश पालखीमध्ये ठेऊन मोटरसायकल रॅलीने यात्रेला प्रारंभ होणार आहे. रामेश्वर मंदिर, गावडेश्वर मंदिर, शिरोडा नाका, कलानगर, मांडवी, दाभोसवाडा, जुना एस.टी.स्टॅण्ड, दाभोली नाका, बाजारपेठ, मारूती मंदिर, हॉस्पिटल नाका, भटवाडी पेट्रोल पंप, आडी स्टॉप, वरसकर स्टॉप, संत लालाजी मंदिर मठ मार्गे खांबड भटवाडी, गणपती मंदिर, डॉन्टस कॉलनी, गवळीवाडा, पॉवर हाऊस, सातेरी मंदिर, राऊळवाडा मार्गे राम मंदिर अशी ही मंगलकलश यात्रा असणार आहे.

      तर पूर्वस मंदिर, शिरोडा नाका, दाभोसवाडा, जुना एसटी स्टॅण्ड, गिरपवाडा, दाभोली नाका, बाजारपेठ, मारूती स्टॉप, हॉस्पिटल नाका, वडाचे सांदेकर, भटवाडी, आनंदी अर्पित, वरसकर स्टॉप, संत लालाजी मंदिर, गणपती मंदिर, डॉन्टस कॉलनी, गवळीवाडा, कॅम्प कॉर्नर, सातेरी मंदिर, राऊळवाडा व राम मंदिर येथे या यात्रेचे स्वागत केले जाणार आहे. तरी या सर्व रामभक्तांनी या यात्रेत सहभागी व्हावे आवाहन हिदुधर्माभिमानी मंडळींनी केले आहे.

 

Leave a Reply

Close Menu