जिल्हा बँकेची उत्तुंग भरारी – साडेपाच हजार कोटींची उलाढाल

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विद्यमान संचालकांनी कारभार सुरू केल्यानंतर दोन वर्षे पूर्ण झाली. अध्यक्ष म्हणून मनीष दळवी आणि उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर यांनी १३ जानेवारी २०२२ रोजी पदभार स्विकारला होता. त्याला दोन वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी अध्यक्ष मनिष दळवी, उपाध्यक्ष अतुल काळसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, संचालक महेश सारंग, दिलीप रावराणे, बाबा परब, समीर सावंत, प्रकाश बोडस, विठ्ठल देसाई, प्रज्ञा ढवण, व्हिक्टर डांटस, गजानन गावडे, विद्याधर परब, मेघनाथ धुरी, विद्याप्रसाद बांदेकर, आत्माराम ओटवणेकर, गणपत देसाई आदी संचालक उपस्थित होते.

    आमची कार्यकारिणी विराजमान झाल्यावर दोन वर्षे होत आहेत. या दोन वर्षात ठेवींची टक्केवारी ७ टक्के पेक्षा वाढली आहे. २२०० कोटीवरून २९०० कोटी झाली आहे. कर्ज रक्कम ४१०० कोटी होती. ती ५५०० कोटी झाली आहे. यावर्षी राज्यातील जिल्हा सहकारी बँकांत ठेवी, कर्ज वितरण, कर्ज वसुली, नफा या सर्वच क्षेत्रात आपली जिल्हा बँक अग्रणी असणार आहे. त्या दृष्टीने आम्ही नियोजनात्मक काम करीत आहोत. शेतकरी, महिला, नवउद्योजक यांच्यासाठी विविध योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने गेल्या दोन वर्षात राबविल्या आहेत व यशाची घोडदौड सुरू ठेवली आहे. विविध नाविन्यपूर्ण कर्ज योजना राबविल्यामुळे साडेपाच हजार कोटींचे कर्ज वितरण झाले आहे. जिल्ह्यातील ग्राहकांनी या बँकेवर विश्वास दाखविला असून ८ टक्क्यापर्यंत व्याज देणारी ठेव योजनाही या बँकेने जाहीर केली आहे व देशातील जिल्हा बँकांमध्ये सिंधुदुर्ग बँकसर्वोत्कृष्ट ठरली असल्याची माहिती अध्यक्ष मनिष दळवी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

   जिल्हा बँकेत सोने तारण कर्ज योजना जास्त चालते. यासाठी १ ग्रॅम सोन्यासाठी ४२०० रुपये होती. ती रक्कम आता ५ हजार रुपये केली आहे.  ठेवी व्याज दर ०.५ टक्के वाढवित तो ८ टक्केपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे. पिक रिक्षा कर्ज धर्तीवर इलेक्ट्रिकल व्यावसायिक वाहन खरेदीसाठी कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जाची नियमित परतफेड करणा­याला व्याज माफीची योजना येत आहे, अशी माहिती उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली.

Leave a Reply

Close Menu