तणावाचे सुयोग्य व्यवस्थापन करा-लक्ष्मीकांत शिदे

को-ऑपरेटीव्ह बँक एम्प्लॉईज युनियन व सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने श्री इच्छापूर्ती गोविद मंगल कार्यालय,ओरोस येथे तणावाचे व्यवस्थापनप्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. या प्रशिक्षण कार्यक्रमाचे व्याख्याते लक्ष्मीकांत शिंदे यांनी तणावाचे सुयोग्य व्यवस्थापन केले असेल तर हा तणाव आपण योग्य प्रकारे हाताळू शकतो. तशी मानसिकता आपण बाळगणे आवश्यक आहे असे सांगून उपस्थित अधिकारी व कर्मचा­यांना उद्बोधक मार्गदर्शन केले.

    बँक ही आपली संस्था, आपलं कुटूंब आहे व आपण त्या कुटुंबाचा एक भाग आहोत अशाप्रकारची मानसिकता ठेऊन जे बँक कर्मचारी बँकेसाठी काम करत आहेत त्याच बँका आजच्या क्षणाला यशस्वी ठरल्या आहेत आणि त्यापैकी आपण एक आहोत याचा मला सार्थ आभिमान आहे. एकत्रितपणे काम केल्यास निश्चितपणे सिंधुदुर्ग जिल्हा ही महाराष्ट्रातील एक आदर्श बँक व आदर्श कर्मचारी असलेली बँक अशी ओळख आपण निर्माण करू शकू असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी केले. मनिष दळवी यांनी अध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर दोन वर्षे पूर्ण झाली याबद्दल युनियनचे कार्याध्यक्ष विष्णू तांडेल यांनी त्यांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन युगा पेडणेकर यांनी केले. यावेळी युनियन पदाधिकारी प्रमोद पार्टे, जनरल सेक्रेटरी नितीन शेटये, रविद्र पावसकर, अमोल सावंत, विष्णू धुरी, कर्मचारी संचालक प्रतिनिधी देवेंद्र धुरी, सुनिल फणसेकर, देवानंद लोकेगांवकर आदी तसेच जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यासह बँकेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Close Menu