सफाई कर्मचा-यांसाठी लाभदायी योजना लागू करणार-मुख्याधिकारी 

वेंगुर्ला नगरपरिषदेचे सर्व अधिकारीकर्मचारी व सफाई कर्मचारी यांच्या अथक परिश्रमामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेचे नाव राज्यात तसेच देश पातळीवर झळकत आहे. सफाई कर्मचा-यांचे अमूल्य योगदान विचारात घेऊन त्यांच्यासाठी नगरपरिषदेमार्फत विविध लाभदायी योजना लागू करण्यात येणार  असल्याची माहिती मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी प्रजासत्ताकदिनी दिली

      भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७४व्या वर्धापनदिनानिमित्त वेंगुर्ला नगरपरिषदेच्या क्रॉफर्ड मार्केट व निशाण तलाव येथे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तर नगरपरिषदेच्या स्वच्छतेमध्ये उत्कृष्ट काम करणा-या सफाई कामगारांचा तसेच शहरास कचरामुक्त शहर बनविण्यासाठी नियमित सहकार्य करणारे स्वाती बेस्ता व माझा वेंगुर्लाचे सदस्य जनार्दन शेटये यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरपमाजी नगरसेवक सुहास गवंडळकरप्रशांत आपटेउमेश येरम यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व अधिकारीकर्मचारी व सफाई कर्मचारी उपस्थित होते. आगामी काळात वेंगुर्ला नगरपरिषदेस १५० वर्षे पूर्ण होणार ओत. त्यानिमित्त यापेक्षा उज्जवल यश प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करून वेंगुर्ला नगरपरिषदेचे नाव उज्ज्वल करूया असे आवाहन मुख्याधिकारी कंकाळ यांनी केले. या कार्यक्रमानंतर नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागामार्फत शहरात फायर बुलेट आणि अग्निशमन वाहनाद्वारे संचलन करण्यात आले.

Leave a Reply

Close Menu