‘महाफिड‘तर्फे संगणक व प्रिटर प्रदान

महाफिडतर्फे बनविण्यात येणारी खते बागबगीच्यांसाठी वापरण्यात येतात. जी महाविद्यालये या महाफिडच्या खतांचा वापर करतात त्यांना कंपनीच्या व्यावसायीक व सामाजिक जबाबदारी फंडातून मदर करण्यात येते. कंपनीचे मॅनेजिग डायरेक्टर प्रविण पार्टील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली २८ वर्षे ही कंपनी महाराष्ट्रातील शैक्षणिक संस्थांना आर्थिक सहकार्य करीत आहे. कंपनीचे सांगलीकोल्हापूरकोकण विभागाचे क्षेत्रीय मॅनेजर तानाजी पवारवेंगुर्ला येथील श्री समर्थ एंटरप्रायझेसचे संचालक अच्युत प्रभूखानोलकर व आदिती प्रभूखानोलकरसेल्स एक्झिक्युटीव्ह सचिन देशमुखप्रॉडक्ट डेव्हल्पमेंट ऑफिसर समर्थ मते, सागर सागवेकरसिधुदुर्ग आंबा काजू बागायतदार संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश चमणकर यांच्या हस्ते संगणक व प्रिटर प्रदान करण्यात आले. यावेळी अॅड.प्रकाश बोवलेकरराजेंद्र आरमारकरशिवराम आरोलकरअनंत वायंगणकरकृषी सहाय्यक लाडू जाधवप्राचार्य डॉ.एम.बी.चौगलेमाजी प्राचार्य डॉ.आनंद बांदेकरप्रा.ए.के.बिराजदारप्रा.एस.एस.कोंडेकरप्रा.धनश्री पाटीलडॉ.बी.जी.गायकवाड आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu