उभादांडा येथील प्रसिद्ध गणपतीचे विसर्जन

सुमारे २५० वर्षांची परंपरा असलेल्या या उभादांडा येथील गणपती मंदिरात दरवर्षी लक्ष्मीपूजनादिवशी नवीन मातीच्या गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. याचे विसर्जन होळी सणाच्या पूर्वी होते. सुमारे चार ते साडेचार महिन्यांच्या कालावधीत या मंदिरात संकष्टी उत्सवाबरोबर वार्षिक जत्रोत्सव, तसेच भजने कीर्तने आदी विविध धार्मिक…

0 Comments

► दीर्घ मागणीनंतर वेंगुर्ला-नृसिहवाडी बस सुरु

ग्राहक पंचायत प्रवासी महासंघाची १७ वर्षांपासूनची असलेली मागणी अखेर पूर्णत्वास आली असून वेंगुर्ला आगारातर्फे वेंगुर्ला-दाभोली-वेतरेमार्गे नृसिहवाडी अशी बससेवा सुरु करण्यात आली आहे. या बससेवेचा शुभारंभ २७ जानेवारी रोजी प्रभारी बसस्थानक प्रमुख निलेश वारंग यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. ग्राहक पंचायत प्रवासी महासंघाचे…

0 Comments

►शिरोडा-वेंगुर्ला-विरार बस सुरु

परिवहन महामंडळ (एसटी) वेंगुर्ला आगाराने प्रवाशांच्या सेवेसाठी शिरोडा-विरार ही नविन बससेवा सुरु केली आहे. सदरची बससेवा ही शिरोडा, वेंगुर्ला, मठ, कुडाळ, कणकवली, राजापूर, पाली, हातखंबा, चिपळूण, पेण, पनवेल, ठाणे, भांडूप, बोरीवली मार्गे विरारला जाणार आहे. शिरोडा येथून संध्याकाळी ३.३० वाजता सुटून  विरार येथे…

0 Comments

►नगरवाचनालयात २४ रोजी ग्रंथप्रदर्शन

राज्याची राजभाषा असलेल्या मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त व्हावा आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे या हेतूने दरवर्षी शासनातर्फे दि. १४ ते २८ जानेवारी या कालावधीत मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येतो. याच अनुषंगाने वेंगुर्ला येथील नगरवाचनालयात रविवार दि.२४ जानेवारी २०२१ रोजी ग्रंथालयाच्या…

0 Comments

►४९ उमेदवारांचे भवितव्य मतदानपेटी बंद

आरवलीत ७५.५२ टक्के तर सागरतीर्थ येथे ७३.६३ टक्के मतदान : १८ जानेवारी रोजी मतमोजणी वेंगुर्ला तालुक्यातील आरवली व सागरतीर्थ ग्रामपंचायतीसाठी एकूण ६ मतदान केंद्रातून ७४.५९ टक्के मतदान पार पडले. एकूण ३३७७ पैकी २५१९ एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून दोन्ही ग्रामपंचायतीच्या ४९ उमेदवारांचे…

0 Comments

►वेंगुर्ल्यात उद्या भव्य बाईक रॅली

श्रीराममंदिर निर्माण निधी समर्पण अभियानाच्या वेंगुर्ला तालुका कार्यालयाचे  उद्घाटन शनिवार दि. १६ जानेवारी सकाळी होणार आहे. तत्पूर्वी सकाळी ९.३० वाजता भव्य बाईक रॅली आयोजित केली आहे. तरी युवाशक्तीने प्रचंड उर्जेसहित बहुसंख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आवाहन वेंगुर्ला तालुका संयोजक गिरीश फाटक आणि सहसंयोजक…

0 Comments

►फासकीत अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू

अणसुर येथील संजय गावडे यांच्या बागेमध्ये २९ डिसेंबर रोजी सायंकाळी शिकारीसाठी लावलेल्या फासकीमध्ये एक बिबट्या अडकलेल्या स्थितीत आढळला होता. या घटनेची माहिती पोलीस पाटील बाबु गावडे व मठ येथील वनविभाग कार्यालयात दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी मठ वनपाल अण्णा चव्हाण, कुडाळ वनक्षेत्रपाल शिंदे, कडावल…

0 Comments

►रेडी समुद्रात बुडणा-या पर्यटकाला वाचविले

रेडी-यशवंतगड येथील समुद्राच्या पाण्यात ३० डिसेंबर रोजी पोहण्यासाठी उरतलेल्या दिल्ली येथील पर्यटक परवेझ खान पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. मात्र, त्याच वेळी रेडी येथील जीवरक्षक संजय गोसावी यांनी त्याला बुडताना किना-यावरुन पाहिले आणि जीवाची पर्वा न करता खोल समुद्रात जाऊन बुडणा-या खान याला…

0 Comments

►ख्रिश्चन बांधवांकडून एकमेकांना नाताळाच्या शुभेच्छा

वेंगुर्ला शहरासह तालुक्यात ख्रिसमस सणाला प्रारंभ झाला आहे. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन बांधवांनी घरोघरी विद्युत रोषणाई तसेच येशू जन्माचे देखावे साकारले आहेत. वेंगुर्ल्यातील कलानगर, उभादांडा, दाभोसवाडा, दाभोली, भटवाडी, हॉस्पिटल नाका, साकववाडा, परबवाडा येथील ख्रिश्चन बांधवांनी एकमेकांच्या घरी जाऊन नातळाची गीते म्हणत शुभेच्छा दिल्या.

0 Comments

►लक्ष्मी पूजनादिवशी गणपतीची प्रतिष्ठापना

दरवर्षीप्रमाणे यंदाही वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा येथील प्रसिद्ध गणपती मंदिरात लक्ष्मी पूजनादिवशी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी या गणपतीचे विसर्जन होणार आहे. तोपर्यंत या मंदिरात संकष्टी, मंगळवार, जत्रा, भजन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

0 Comments
Close Menu