शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्ह्यातील नागरिकांचा पाठिंबा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय‘‘ लवकरात लवकर व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समिती सभापतीवेंगुर्लाकुडाळ नगराध्यक्ष व काही ग्रामपंचायतींना निवेदन देण्यात आली. जिल्ह्यासाठी ही काळाची गरज असून आपण लोकप्रतिनिधी व अधिकारी या नात्याने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदन कर्त्यांनी केली.  यावेळी यशवंतगड शिवपेमीसिंहगर्जना ग्रुप वेंगुर्लावेताळ प्रतिष्ठान ग्रुपतुळसचे रुपाली परबवैशाली वडरअभिषेक रेगेभुषण मांजरेकरसरोज परबसुकन्या परबसौरभ नागोळकरसंपदा राणेसाईप्रसाद भोईराहुल मोर्डेकरसौरभ धुरीअमित नाईकप्रणव वायंगणकररोहन नाईकसुरज मालवणकरसचिन परुळकरमहेश राऊळविवेक तिरोडकरप्रशांत सावंतकिरण राऊळनिखिल ढोलेसोनाली आंगचेकरवैभव होडावडेकरप्रसाद परुळकर उपस्थित होते.

    शासकीय वैद्यकीय महाविद्यालयकृती समिती जिल्हा सिंधुदुर्ग कडून मुख्यमंत्र्यांसहमंत्रीराज्यमंत्रीखासदारआमदार यांना वारंवार निवेदन सादर करण्यात आली आहेत. तसेच जनजागरण करुन २५००० नागरिकांनी पोस्ट कार्ड व १३० ठराव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जसे ग्रामपंचायतपंचायत समितीनगरपालिकानगर पंचायत यांनी पारीत केलेले ठराव जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्यामार्फत तत्कालिक मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले. १५ ऑगस्ट २०१९ रोजी लाक्षणिक उपोषण पण प्रताधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. तसेच जिल्ह्यात नागरिकांनी मेल करुन आपली मागणी मुख्यमंत्री  उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पर्यंत पण पोचवली आहे.

Leave a Reply

Close Menu