सिंधुदुर्ग जिल्ह्यात ‘‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय‘‘ लवकरात लवकर व्हावे यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील पंचायत समिती सभापती, वेंगुर्ला, कुडाळ नगराध्यक्ष व काही ग्रामपंचायतींना निवेदन देण्यात आली. जिल्ह्यासाठी ही काळाची गरज असून आपण लोकप्रतिनिधी व अधिकारी या नात्याने शासनाकडे पाठपुरावा करावा अशी मागणी निवेदन कर्त्यांनी केली. यावेळी यशवंतगड शिवपेमी, सिंहगर्जना ग्रुप वेंगुर्ला, वेताळ प्रतिष्ठान ग्रुप, तुळसचे रुपाली परब, वैशाली वडर, अभिषेक रेगे, भुषण मांजरेकर, सरोज परब, सुकन्या परब, सौरभ नागोळकर, संपदा राणे, साईप्रसाद भोई, राहुल मोर्डेकर, सौरभ धुरी, अमित नाईक, प्रणव वायंगणकर, रोहन नाईक, सुरज मालवणकर, सचिन परुळकर, महेश राऊळ, विवेक तिरोडकर, प्रशांत सावंत, किरण राऊळ, निखिल ढोले, सोनाली आंगचेकर, वैभव होडावडेकर, प्रसाद परुळकर उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कृती समिती जिल्हा सिंधुदुर्ग कडून मुख्यमंत्र्यांसह, मंत्री, राज्यमंत्री, खासदार, आमदार यांना वारंवार निवेदन सादर करण्यात आली आहेत. तसेच जनजागरण करुन २५००० नागरिकांनी पोस्ट कार्ड व १३० ठराव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे जसे ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका, नगर पंचायत यांनी पारीत केलेले ठराव जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्यामार्फत तत्कालिक मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले. १५ ऑगस्ट २०१९ रोजी लाक्षणिक उपोषण पण प्रताधिकारी कार्यालय येथे करण्यात आले. तसेच जिल्ह्यात नागरिकांनी मेल करुन आपली मागणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पर्यंत पण पोचवली आहे.