वेंगुर्ल्यात आज २५ रुग्ण कोरोना पॉझिटीव्ह

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (दि.१६) १९० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून त्यात वेंगुर्ला तालुक्यातील २५ रुग्णांचा समावेश आहे.

      आज सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये वेंगुर्ला शहरात २ रुग्ण पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील १ आणि वडखोल तुळस येथील १ हे दोन्ही मागील रुग्णांच्या सहवासीत आहेत. तर संध्याकाळी आलेल्या रिपोर्ट मध्ये वेंगुर्ला शहरात ६ नवीन, वेतोरे येथे १ सहवासीत, म्हापण येथे २ सहवासीत, आरवली येथील ६ सहवासीत, शिरोडा येथे १ नवीन तर रेडी येथील ७ सहवासीत यांचा समावेश असल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली.

 

Leave a Reply

Close Menu