कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना ५० लाख रुपयाची मदत मिळावी

राज्यातील पत्रकाराचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकांराना कोरोना योद्धे म्हणून ५० लाख रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी वेंगुर्ला तालुका पत्रकार संघातर्फे वेंगुर्ला तहसिलदार यांना निवेदन सादर करुन करण्यात आली.

      वेंगुर्ला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष के.जी.गावडेसचिव दाजी नाईकसहसचिव विनायक वारंगसदस्य प्रथेमश गुरवअजित राऊळदिपेश परब यांनी शुक्रवारी वेंगुर्ला तहसिलदार उपस्थित नसल्याने नायब तहसिलदार नागेश शिदे यांना निवेदन देऊन ही मागणी केली.

      महाराष्ट्रात कोरोनाचे संकट अधिक उग्र आणि व्यापक झालेले आहे. माध्यम क्षेत्र देखील त्यापासून अलिप्त राहिलेले नाहीत. ५०० पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झालेली आहे. जवळपास ५० पत्रकारांवर विविध रुणालयात उपचार सुरु आहेत आणि कोरोनामुळे २५ पत्रकारांचे बळी गेले आहेत. आरोग्यमंत्री टोपे यांनी पत्रकारांचे कोरोनामुळे निधन झाल्यास त्यांच्या कुटुंबियाना ५० लाख रुपयांची मदत करण्याची घोषणा केली होती. मात्र कोरोनाने २५ पत्रकारांचे बळी गेल्यानंतरही एकाही पत्रकाराच्या नातेवाईकाला सरकारकाने मदत दिली नाही. शासनाने घोषणा केल्याप्रमाणे दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबियांना तातडीने ५० लाख रुपयांची आर्थिक मदत मिळावी वगैरे मागणीचे निवेदन देवून चर्चा केली.

Leave a Reply

Close Menu