वेंगुर्ला आगारातून तालुक्यासह लांब पल्ल्याच्या बस फे­-यांना प्रारंभ

राज्य परिवहन वेंगुर्ला आगारातून ग्रामीण जनतेच्या सोयीसाठी रेडी-कनयाळकेळूसनिवतीअणसूरपालतुळसहोडावडेवेतोरेखानोलीदाभोली मार्गावर सकाळसंध्याकाळ अशा एकूण ६४ फे-या सुरु करण्यात आल्या आहेतअशी माहिती वेंगुर्ला आगाराचे आगारप्रमुख जी.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

      जिल्ह्याबाहेरील वाहतुकीसाठी वेंगुर्ल्याहून सध्या सकाळी ६.३० वा. रत्नागिरी७ वा. अक्कलकोट८ वा. पूणे८.३५ वा.कोल्हापूर११ वा.कोल्हापूरदुपारी २ वा. कोल्हापूर अशा फे-या सुरु करण्यात आल्या आहेत.

      शासनाने राज्याच्या सीमा खुल्या केल्यामुळे वेंगुर्ला आगारातून सकाळी ६ वा. वास्को व परत ९.३० वास्को ते वेंगुर्ला अशी बस सुरु केली अहे. पणजी-गोवा परिसरात जाणा-या येणा-या जनतेला सोयीस्कर म्हणून सदर बसची वाहतुक दि.२८ सप्टेंबरपासून चालू करण्यात येत आहे. शासनाच्या कोविड-१९ नियमावलीच्या अधिन राहून सदरची वाहतूक करण्यात येणार आहे.

      शासनाच्या आदेशाप्रमाणे राज्य परिवहन गाड्यातून पूर्ण क्षमतेने १०० टक्के प्रवाशी वाहतूक चालू करण्यात आली आहे. तसेच पूर्वीप्रमाणेच मासिक पास सवलतज्येष्ठ नागरीक सवलतदूर्धर आजार सवलतीसंगणक कोर्सटायपिगसाठी ६६ टक्के सवलत पूर्वीप्रमाणेच सर्व सवलती व पास देण्याची कार्यवाही चालू करण्यात आलेली आहे.

      तरी जनतेने वरील सर्व गाड्यांचा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला आगारप्रमुख जी.एस.चव्हाण केले आहे.

This Post Has One Comment

  1. वेंगुर्ला – वास्को आणि परत या मार्गावर तूर्तास तरी बस वाहतुक करू नये. कारण वास्को परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट आहे.

Leave a Reply

Close Menu